मुंबईत महिला अत्याचारांत वाढ, Increase in violence against women cases in Mumbai

मुंबईत महिला अत्याचारांत वाढ

मुंबईत महिला अत्याचारांत वाढ
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्याचं समोर आलंय.. अजूनही राज्यात महिला असुरक्षितच आहेत हे सिद्ध करणा-या दोन घटना गेल्या तीन दिवसांत घडल्यात. सांस्कृतिक उपराजधानी डोंबिवलीत महिला अत्याचाराचा घृणास्पद प्रकार उघड झाला.

एका उद्धट प्रवाशाने दोन महिला कंडक्टरला मारहाण करत त्यांचा विनयभंग केलाय. कल्याणहून पनवेलच्या दिशेने जाणा-या एसटी बसमध्ये क्षुल्लक वादातून ही घटना घडली. या मारहाणीत या महिला वाहकांचे कपडे फाटले. तर दुसरीकडे मीरारोडमध्ये धावत्या लोकलमध्ये काल सकाळी एका तरूणीवर हल्ला करण्यात आला.

भाईंदरमध्ये राहणारी अपूर्वा चक्रवर्ती नावाची ही तरूणी लोकलने चर्चगेटला जात असताना, मीरारोडला एक अज्ञात तरूण डब्यात घुसला. त्याने अपूर्वाला हातोड्याने मारहाण करून तिच्या गळ्यातली चैन, हातातल्या बांगड्या आणि पायातले पैंजण असा ऐवज लुटला व तो पसार झाला.

या हल्ल्यात अपूर्वा जखमी झाली. या घटनेमुळं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.. शक्ती मिल प्रकरणानंतरही सरकारनं धडा घेतला नसल्याचं या निमित्ताने समोर येतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 6, 2014, 23:38


comments powered by Disqus