मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत , Indicate the extent of the Chief Minister in the Cabinet

मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत

मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत
www.24taas.com,मुंबई

केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल झाल्यानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते. त्यापार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस नेत्यांनी मंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केलंय.

मंत्रीपदासाठीच्या इच्छुकांनी आज राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेट घेतली. यामध्ये आमदार दिलीप सानांदा, दिनानाथ पडोळे, सुभाष धोते, सुनील केदार हे सध्या दिल्लीत आहेत. गोपाळ अग्रवाल आणि मंत्री संजय देवताळे यांनीही मोहन प्रकाश यांची भेट घेतली.

दरम्यान, दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुचर्चित विस्तार २८ ऑक्टोबर २०१२ ला झाला. सात कॅबिनेट मंत्री, दोन स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री आणि १३ राज्यमंत्र्यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. कॅबिनेट मंत्र्यांमध्ये के. रहेमान खान, दिनशा पटेल, अजय माकन, पल्लम राजू, अश्विनी कुमार, हरिश रावत आणि चंद्रेश कुमारी कटोच यांचा समावेश आहे.



First Published: Tuesday, October 30, 2012, 22:27


comments powered by Disqus