टोल आकारणीची माहिती आता डिजीटल बोर्डवर, Information about toll is now on digital board

टोल आकारणीची माहिती आता डिजीटल बोर्डवर

टोल आकारणीची माहिती आता डिजीटल बोर्डवर

www.24taas.com, मुंबई

राज्य सरकारनं खासगीकरणातून बीओटी तत्त्वावर बांधलेल्या सर्व रस्त्यांवरील टोलनाक्यांवर टोल आकारणीबाबतची सर्व माहिती दाखवणारे डिजीटल बोर्ड 15 सप्टेंबरपूर्वी बसवण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केल्या आहेत.

भुजबळांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्य़ा वरिष्ठ अधिका-यांच्या बैठकीत हे आदेश दिलेत. या फलकांवर प्रकल्पाची एकूण किंमत, टोल वसुलीचा पूर्वनिश्चित कालावधी, झालेली टोलवसुली आणि होणा-या टोलवसुलीची रक्कम या बाबी स्पष्टपणे दिसाव्यात तसंच हा फलक दिवसा आणि रात्रीही दिसायला हवेत, असे निर्देश भुजबळांनी या वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिलेत. या बोर्डाचा आकार चार फूट रुंद आणि आठ फूट लांब असा असेल.

तसंच, टोलनाक्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी लवकरच वाहनधारकांना ई-टॅग उपलब्ध करून दिले जाणार आहेत, तसे निर्देशही छगन भुजबळांनी दिलेत. याव्यतिरिक्त गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याची कामं प्राधान्यानं हाती घ्या, असंही भुजबळांनी आवर्जून सांगितलंय.

First Published: Thursday, August 23, 2012, 11:52


comments powered by Disqus