Last Updated: Wednesday, July 17, 2013, 21:35
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईविधानभवनाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांचे पुतळे आहेत... यातला शिवाजी महाराजांचा पुतळा वगळता अन्य पुतळ्यांची विधान भवनाकडे पाठ आहे. त्यामुळे या पुतळ्यांची दिशा बदलण्यासाठी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींनी उद्या एक बैठक बोलावली आहे.
तसंच मारोतराव कन्नमवार, शंकरराव चव्हाण, सुधाकरराव नाईक आणि विलासराव देशमुख या दिवंगत मुख्यमंत्र्यांचे पुतळे नव्यानं उभारण्याचा निर्णयही या बैठकीत होऊ शकतो... राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्यांनी विधानभवनाकडे तोंड केल्यानंतर तिथं घडणा-या असंसदीय आणि अप्रिय घटनांना आळा बसेल, अशी आशा आहे...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, July 17, 2013, 21:35