Last Updated: Monday, December 23, 2013, 19:58
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई मुंबईतला सर्वात महाग व्यापारी भाडेतत्वावरचा भाग कोणता? असा प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर आता ‘नरीमन पॉईंट’ असं नक्कीच असणार नाही... कारण, या प्रश्नाचं सध्याचं उत्तर आहे बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात ‘बीकेसी’.
मुंबईत आता ऑफीसेस थाटण्यासाठी सर्वाधिक बूम ‘बांद्रा-कुर्ला कॉम्पेक्स’ भागातच आहेत. एकेकाळी मुंबईतली सर्वाधिक ऑफीसेस नरिमन पॉईंट भागात होती. मात्र, आता ‘बीकेसी’लाच सर्वाधिक पसंती मिळतेय.
नरिमन पॉईंटवर जागेसाठी जून २०१३ पर्यंत २४३ रूपये प्रति चौरस फूट असा दर होता. तो आता ३ रूपयांनी कमी होऊन २४० रूपये प्रतिचौरस फुटांवर आलाय. तर बांद्रा कुर्ला कॉप्लेक्समध्ये भाडेशुल्काचा हाच दर प्रति चौरस फूट २९० रूपयांवर पोहोचलाय. अर्थातच, बीकेसी भागात ऑफिसेस थाटणं आता महाग तर ठरेलच पण हा स्टेटसचाही एक भाग ठरेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, December 23, 2013, 19:58