तुमचा गणपती देव आहे का? - डाँ. झाकीर , Is Ganpati a lord, say`s dr. zakhir

तुमचा गणपती देव आहे का? - डॉ. झाकीर

तुमचा गणपती देव आहे का? - डॉ. झाकीर
www.24taas.com, मुंबई

‘पीस’ चॅनलवरून इस्लाम धर्माचा प्रचार करणाऱ्या डॉ. झाकीर नाईक याने ऐन गणेशोत्सवात गणरायांनावरच प्रश्न उपस्थित केला आहे. गणपती देव असल्याचे सिद्ध करा, अशाप्रकारचं वादग्रस्त वक्तव्य झाकीर नाईक याने फेसबुकवर केले आहे. डॉ. नाईक यांच्या या वक्तव्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. झाकीर याच्यावर कडक कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

फेसबुक या सोशल साइटवर असलेल्या आपल्या अकाऊंटमध्ये त्याने गणपती बाप्पा आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. गणपती कोण आहे, गणपतीच्या जन्माचे रहस्य काय असे प्रश्नप त्याने केले आहेत. गणपती देव असल्याचे सिद्ध केल्यास मी प्रसाद भक्षण करेन.

एवढेच नाही तर ‘जर तुमचा देव स्वत:च्या मुलाला ओळखू शकत नाही, तर तो मी संकटात असल्याचे कसे ओळखणार’ अशाप्रकारचे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे फेसबुकवरील अकाऊंट बंद करण्याची मागणी होत आहे. मुस्लिम बांधवांना सहिष्णुतेचे डोस पाजणारा डॉ. झाकीर नाईक हा इस्लामी जगतात विचारवंत म्हणून ओळखला जातो.


First Published: Monday, September 24, 2012, 12:39


comments powered by Disqus