Last Updated: Friday, November 30, 2012, 10:19
www.24taas.com, मुंबई कॅबिनेट बैठकीत अखेर गुरुवारी सायंकाळी सिंचनाची श्वेतपत्रिका मुख्यमंत्र्यांनी सादर केली. जवळपास पाचशे पानांची ही श्वेतपत्रिका दोन खंडांमध्ये सादर करण्यात आलीय.
पहिल्या खंडात सिंचनाची माहिती तर दुसऱ्या खंडात सिंचन प्रकल्पांची माहिती देण्यात आलीय. त्याचबरोबर सिंचनाची पुढची दिशा काय असावी, यासंदर्भातल्या सूचनाही श्वेतपत्रिकेत करण्यात आल्यायत. सिंचनाची श्वेतपत्रिका गुरुवारी सादर करण्यात येईल, असं वृत्त सगळ्यात आधी ‘झी २४ तास’नं दिली होती. त्यानुसार काल मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीत ही श्वेतपत्रिका सादर करण्यात आलीय. ही श्वेतपत्रिका सर्व जनतेला हाताळता यावी यासाठी राज्य सरकारच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
दरम्यान, या सरकारनं सादर केलेल्या या श्वेतपत्रिकेवर विरोधकांनी जोरदार टीका केलीय. ही श्वेतपत्रिका नसून धूळफेक पत्रिका आहे.... सरकारनं व्हाईट पेपर सादर केलेला नाही तर व्हाईट वॉश केलंय, अशी टीका विरोधकांनी केलीय.
First Published: Friday, November 30, 2012, 10:19