Last Updated: Sunday, April 6, 2014, 17:21
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईदिल्लीची कोयल राणानं यंदाचा `मिस इंडिया` किताब पटकावलाय. तर दुसरं स्थान मुंबईची जातालेका मल्होत्रा आणि तिसरं स्थान गोव्याची गेल निकोल डिसिल्वा हिनं पटकावलं. मुंबईच्या यशराज स्टुडिओमध्ये शनिवारी रात्री आयोजित एका रंगारंग कार्यक्रमात विजेत्यांचं नाव घोषित करण्यात आलं. स्पर्धेत २४ तरुणी सहभागी झाल्या होत्या.
माजी मिस इंडिया नवनीत कौरनं कोयलला मुकुट घातला. कोयलनं वयाच्या १५व्या वर्षीच `मिस टीन इंडिया-२००८` हा किताबही पटकावला होता. सुप्रसिद्ध गाय मिका सिंह यानं या कार्यक्रमात त्याचं प्रसिद्ध गाणं `अगल बगल` आणि बिग बींच्या `भूतनाथ रिटर्न्स`मधील गाण `पार्टी तो बनती है` हे दोन गाणी सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता रितेश देशमुखनं केलं. कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं ज्येष्ठ अभिनेत्री जीनत अमान यांना दिलेलं ट्रिब्यूट होतं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, April 6, 2014, 16:51