महिला दिन: जेट आणि एअर इंडियाची विशेष ऑफरJet Airways, GoAir offer special scheme for women on Women`

महिला दिन: जेट आणि एअर इंडियाची विशेष ऑफर

महिला दिन: जेट आणि एअर इंडियाची विशेष ऑफर
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई

जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत भारतीय विमान कंपनींनी महिलांसाठी विशेष ऑफर ठेवल्या आहेत. महिलांसाठी जेट एअरवेजनं विमान प्रवासाच्या तिकीटावर सूट दिलीय. तर गोएअरनं कमीतकमी भाड्यामध्ये बिझनेस क्लासनं प्रवास करण्यासाठी महिलांना मुभा दिलीय.

नरेश गोयल यांच्या जेट एअरवेजनं महिलांना आंतरराष्ट्रीय प्रवासात आधारित भाड्यामध्ये १० टक्के सवलत देऊ केलीय. तर घरगुती प्रवासाबाबतही हे लागू असेल. ही ऑफर जेट एअरवेज आणि जेट कनेक्ट दोन्ही विमानसेवांसाठी असेल.
विशेष म्हणजे जेट एअरवेजची ही ऑफर दोन महिन्यांच्या बुकिंग अवधीसोबत आहे. सर्व टिकीटांचं बुकिंग ८ मार्च २०१४ ते ८ मे २०१४ दरम्यान ऑनलाईन करावं लागेल आणि प्रवासाची वैधता ११ महिन्यांची असेल.

गेल्या काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी सर्व महिला क्रू सदस्यांची उड्डाणं ठेवणाऱ्या एअर इंडियानं यंदाही हाच कार्यक्रम कायम ठेवलाय. तर नूस्ली वाडिया यांच्या गोएअरनं महिला प्रवाशांसाठी एका विशेष योजनेची घोषणा केलीय. यात अवघ्या ९९९ रुपयांमध्ये महिला प्रवाशांना बिझनेस क्लासमध्ये अपग्रे़ड केलं जाईल.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, March 7, 2014, 22:07


comments powered by Disqus