आव्हाड `साहेबांची` पोलिसांना दमदाटी यू ट्यूबवर, jitendra avhad threaten to police office in mumbra

आव्हाड `साहेबांची` पोलिसांना दमदाटी यू ट्यूबवर

आव्हाड `साहेबांची` पोलिसांना दमदाटी यू ट्यूबवर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आपल्या अर्वाच्य भाषेसाठी ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आता अडचणीत सापडलेत.

त्याचं झालं असं की, आमदारसाहेब एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत झापत असल्याचा व्हिडिओ सध्या यू ट्यूबवर वायरल झालाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच आमदार साहेबांचा हा प्रताप जगजाहीर झाल्यानं त्यांच्यावर संकट कोसळण्याची शक्यता आहे.

काही गुन्ह्यातील संशयित आरोपींना धुंडाळत असताना पोलिसांनी मुंब्र्यातील रसिद कम्पाऊंडमध्ये कोम्बिंग ऑपरेशन केलं होतं... याबद्दल जाब विचारण्यासाठी आमदार साहेबांनी पोलिसांना जमावासमोर फैलावर घेतलं. एव्हढंच नाही तर अर्वाच्या भाषेत शिवीगाळ करत आव्हाड `साहेबांनी` पोलिसांना चांगलीच दमदाटीही केली. `तुम्ही हफ्ता खाता आणि आम्हाला शिकवणार... हजार-दोन हजार रुपये हप्ता खाणारे आम्हाला शिकवणार... करा तुम्ही कोम्बिंग ऑपरेशन तुम्हाला आत्ता दाखवतो... शिवसेनेची सुपारी घेता तुम्ही... आता पहिलं आणि शेवटचं सांगतोय, याच्यापुढे मस्ती केली तर हप्तापाणी बंद करून टाकीन... मुंब्रा बंद करायला पाच मिनिटं लागणार नाहीत... आयुष्य, करिअर खराब करून टाकीन` असं म्हणत पोलीस अल्पसंख्यक समाजाला जाणूनबुजून टार्गेट करत असल्याचा दावा करत आव्हाड यांनी यावेळी चांगलाच गोंधळ घातला. आव्हाडांचा हा गोंधळ यू ट्यूबवर मुंब्रा कोम्बिंग ऑपरेशनच्या नावानं पाहायला मिळतोय.

शरद पवार यांचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आव्हाडांनी टाकलेल्या दबावामुळे पोलिसांना आपली कारवाई आवरती घ्यावी लागली. यामुळे वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता दिसून येतेय.

मुंब्य्रातील या घटनेनंतर वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एसीपी अमित काळे यांना गेल्या शुक्रवारी सक्तीच्या रजेवरही धाडलंय.

या घटनेबद्दल आमदार साहेबांशी संपर्क साधला असता, आपल्याला केवळ एसीपी अमित काळे यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल तक्रार असल्याचं त्यांनी म्हटलंय.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 20, 2014, 13:25


comments powered by Disqus