Last Updated: Tuesday, May 27, 2014, 19:59
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई लेखा लिपिक / लेखा परीक्षा लिपिक व कनिष्ठ लेखपाल / कनिष्ठ लेखा परिक्षक यांची एकूण 516 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय.
याच परिक्षेची जाहिरता याआधीही देण्यात आली होती परंतु, लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता लागू जाल्यानं दिनांक 12 मार्च 2014 रोजी ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. पण, आता पुन्हा या पदांसाठी भरती जाहीर करून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
इच्छूक उमेद्वारांना ऑनलाईन अर्ज दाखल करावे लागणार आहेत. जाहीरातीचा तपशील दोन्ही संचालनलायांच्या
http://mahakosh.maharashtra.gov.in / http://mahalfa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
Employee Corner - recruitment इथं दिनांक 28 मे 2014 पासून उपलब्ध होईल. इथेच तुम्ही ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता.
28 मे 2014 ते 17 एप्रिल 2014 या दरम्यान इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील.
.
First Published: Tuesday, May 27, 2014, 19:53