Last Updated: Tuesday, February 18, 2014, 21:54
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अशोक जैन यांचं मुंबईत निधन झालंय. अंधेरीच्या ब्रह्मकुमारी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
मृत्यूसमयी जैन हे ६९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. बारा वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला. तसंच पाच वर्षांपूर्वी त्यांना पुन्हा पक्षाघाताचा त्रास झाला. तेव्हापासून ते अंथरुणालाच खिळून होते.
`महाराष्ट्र टाईम्स`मधल्या प्रदीर्घ कारकिर्दीत जैन यांनी अनेकविध लेखन केलं. कानोकानी या स्तंभातून त्यांनी `कलंदर` नावानं अनेक विषयांवर खुमासदार शैलीत भाष्य केलं. त्यांच्या या लेखांचा संग्रह पुस्तकाच्या रुपानं वाचकांमध्ये प्रिय आहेत.
मटाचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली. ज्यात त्यांनी `कानोकानी` आणि `राजधानीतून` ही सदरं वाचकप्रिय ठरली. अलिकडेच `राजधानीतून` या लेखसंग्रहांचं त्यांचं पुस्तकही प्रकाशित झालं होतं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 18, 2014, 21:54