Last Updated: Friday, June 13, 2014, 16:45
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईलातूरमधल्या काँग्रेस नेत्या कल्पना गिरी हत्या प्रकरण ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवण्याची ग्वाही गृहमंत्रालयानं दिलीय.
कल्पना गिरींच्या नातेवाईकांना शिवसेना आमदार नीलम गोऱ्हे यांच्यासह गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेतली. यावेळी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं आश्वासनही गृहमंत्र्यांनी दिलंय. या प्रकरणातल्या दोन फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही देण्यात आलेत.
21 मार्चला कल्पना गिरी अमित देशमुखांच्या बर्थडे पार्टीला गेल्या होत्या. त्यानंतर त्या परतल्या नसल्याचं सांगितलं जातंय. मुख्य आरोपी महेंद्रसिंग चव्हाण याच्यासह चार आरोपी याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, June 13, 2014, 16:45