Last Updated: Sunday, November 4, 2012, 15:49
www.24taas.com, मुंबई26/11 हल्ल्यातला दहशतवादी मोहम्मद अजमल कसाब, याला डेंग्यूची लागण झाली आहे. ऑर्थर रोड जेलमध्येच त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
मुंबई डेंग्यू आणि मलेरियाच्या विळख्यात सापडली आहे. याशिवाय कॉलरा आणि डायरियानंही आजारी असलेल्या मुंबईतील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रख्यात निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा डेंग्यूमुळे निधन पावले होते. मात्र आता डेंग्यूच्या डासाने २६/११ चा हल्लेखोर कसाब यालाही सोडलं नाही. ऑर्थर रोड जेलमध्ये कडेकोट सुरक्षेत असलेल्या दहशतवादी कसाबला आता डेंग्यूची लागण झाली आहे.
२६य११ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात वाचलेल्या अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र तरीही कसाब अजूनही जिवंतच आहे. ज्याने अनेक निरपराध लोकांचे बळी घेतले त्या कसाबवर आता पर्यंत तब्बल २६ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. एखाद्या व्हीव्हीआयपीलाही लाजवेल एवढा खर्च कसाबच्या सुरक्षेवर करण्यात आला आहे. मात्र आता या सुरक्षेला भेदत कसाबला डेंग्यूचा डास चावला असून कसाबला डेंग्यूची लागण झाली आहे.
First Published: Sunday, November 4, 2012, 15:49