Last Updated: Tuesday, September 25, 2012, 11:33
www.24taas.com, मुंबईफाशीच्या शिक्षेस स्थगिती देण्याची विनंती करणारा दहशतवादी अजमल कसाबचा दयेचा अर्ज राज्याच्या गृहमंत्रालयानं फेटाळलाय. तसे मुख्यमंत्र्यांना गृहखात्यानं कळविले आहे.
आता नियमानुसार मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून केंद्रीय गृहमंत्रालयास याबाबत कळविण्यात येईल. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालय आपली शिफारस राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवेल. कसाबच्या फाशीच्या शिक्षेची तातडीनं अंमलबजावणी करण्याची मागणी समाजातल्या सर्व स्तरातून होतेय.
त्यासाठी कसाबला ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेची विनाविलंब अंमलबजावणी व्हावी यासाठी त्यानं केलेला दयेचा अर्ज तातडीनं फेटाळून निकाली काढावा, अशी जोरदार मागणी होतेय.
First Published: Tuesday, September 25, 2012, 11:33