Last Updated: Thursday, November 29, 2012, 16:32
www.24taas.com,मुंबईभाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांवर गंभीर आरोप केला आहे. भुजबळ कुटुंबियांच्या संपत्तीत तीन वर्षांत १०० पटीनं वाढ झालीय आहे, असे आरोप करताना त्यांनी म्हटले.
भुजबळ कुटुंबियांची मालमत्ता तीन वर्षांत २१ कोटींवरून २१०० कोटींवर गेली आहे, सोमय्या यांनी सांगून नवीन धमाका उडवून दिला आहे. त्यातच भुजबळ यांना राष्ट्रवादीत एकटेच पाडण्यात येत असल्याचे भुजबळ यांनी जाहीर रित्या बोलून दाखविले आहे. आता किरट सोमय्या यांनी केलेल्या आरोपानंतर भुजबळ आणि त्यांचे कुटुंबिय काय भूमिक घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
या आधी सोमय्या यांनी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी विविध कंपन्यांच्या माध्यमातून भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप केला होता. मात्र, या आरोपात तथ्य नसल्याचे सांगून किरीट सोमय्या यांचे आरोप भुजबळ आणि तटकरे यांनी फेटाळले होते. तसेच हिंमत असेल तर भुजबळ यांनी आपल्या विरोधात खटला भरून दाखवावा, असे आव्हान सोमय्या यांनी दिले होते.
First Published: Thursday, November 29, 2012, 16:32