रेल्वेत घुसून महिलेला चाकूनं भोसकलं, lady attack in westerns railway

धक्कादायक : रेल्वेत घुसून महिलेला चाकूनं भोसकलं

<B> <font color=red> धक्कादायक :</font></b> रेल्वेत घुसून महिलेला चाकूनं भोसकलं
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईत पहाटेच्या सुमारास रेल्वेच्या डब्यात घुसून एका महिलेला एका अज्ञात इसमानं चाकूनं भोसकल्यानं एकच खळबळ उडालीय.

शनिवारी पहाटे चारच्या सुमारास पश्चिम मार्गावरून विरार-चर्चगेट रेल्वेत पन्ना जनिया अंधेर ही ५० वर्षीय भाजीविक्रेती महिला चढली. मोटरमनच्या केबिनला लागून असलेल्या माल डब्यात ही महिला बसली होती.

ही ट्रेन नालासोपारा - वसई या स्टेशनदरम्यान असतानाच एका अज्ञात इसमानं पन्ना यांच्या पोटात चाकू भोसकला. या इसमाचा पोलीस शोध घेत आहेत.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पन्ना यांना तातडीनं वसईच्या रवी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु, एव्हाना त्यांचा मृत्यू झाला होता. पन्ना अंधेर या सोपारा गाव, गास डोंगरी इथं राहत होत्या.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 22, 2014, 12:28


comments powered by Disqus