महिलेने दोन मुलींसह ट्रेनखाली केली आत्महत्या, lady Suicide with her 2 daughter

महिलेने दोन मुलींसह ट्रेनखाली केली आत्महत्या

महिलेने दोन मुलींसह ट्रेनखाली केली आत्महत्या
www.24taas.com, मुंबई

विरारमध्ये एका महिलेनं तिच्या दोन लहानग्या मुलींसह ट्रेनखाली आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलीये. विरारच्या मनवेल पाडा परिसरात राहणा-या या ३५ वर्षीय महिलेचं नाव सारिका भोसले असं आहे.

शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास ही महिला विरारच्या प्लॅटफॉर्म क्रमांक आठसमोर गेली आणि प्लॅटफॉर्म दोन वरून येणा-या लोकलखाली तिने या चिमुरड्या जीवांसह उडी मारली.

आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. मात्र, या आत्महत्येमुळे परिसरातील लोकांना मात्र धक्का बसलाय. पोलीस पुढील तपास करीत आहेत.


First Published: Saturday, October 27, 2012, 10:58


comments powered by Disqus