Last Updated: Wednesday, September 25, 2013, 18:56
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईगणेश भक्तांशी मुजोरी करणा-या आणि पोलिसांनाही मारहाण करण्यापर्यंत मजल मारणाऱ्या `लालबागचा राजा` गणेशोत्सव मंडळाने सर्वाधिक वीजचोरी केल्याचे उघड झालं आहे.
वीजचोरी केल्याबद्दल या मंडळाकडून बेस्टने 21 हजार 833 रुपयांची दंडवसुली केल्याची माहिती ‘बेस्ट’च्या वतीने उच्च न्यायालयात देण्यात आलीय. माजी पत्रकार केतन तिरोडकर यांनी गणेशोत्सव मंडळांच्या वीजचोरीबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. अशा गणेशोत्सव मंडळांवर कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. त्यानुसार बेस्टने प्रतिज्ञापत्र दाखल केलेय.
वीज चोरीप्रकरणी एकूण 39 मंडळांकडून तब्बल 1 लाखाहून अधिक दंडवसुली करण्यात आलीय. त्यामध्ये लालबागचा राजा मंडळाकडून सर्वाधिक 21 हजार 833 रूपयांचा दंड वसूल करण्यात आलाय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, September 25, 2013, 18:55