Last Updated: Thursday, November 21, 2013, 13:59
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई मुंबईत आज अग्नीतांडव पाहायला मिळाला. एकीकडे बॅक बे आगार परिसरातल्या आंबेडकरनगर झोपडपट्टीला भीषण आग लागली. तर त्यापूर्वी वडाळ्यात ट्रक टर्मिनसमधल्या लोढा बिल्डिंगच्या शेजारी न्यू कफ परेड कंपाऊंडमध्ये एल अँड टीच्या इमर्जन्सी एव्हिटेशन प्लांटला आग लागली होती.
आता ही आग विझवण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या आल्या होत्या. सकाळी पावणे अकराच्या दरम्यान ही आग लागली होती. ह्या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, November 21, 2013, 13:59