Last Updated: Saturday, August 10, 2013, 15:21
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई सध्या रस्त्यावर रंगीबेरंगी आकर्षक आणि स्वस्त खेळणी सहज उपलब्ध होत आहेत. मनीष मार्केट, सारा सहारा अशा ठिकाणी तर अशा स्वस्त चायनीज खेळण्यांची चलतीच आहे. पण हीच खेळणी लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक आहेत.
चायना मेड खेळण्यातील ‘लेझर लाईटस्’ आपल्या बाळाच्या नाजूक डोळ्यांना सहज धोका पोहचवू शकतात, असा इशारा डॉक्टरांनी दिलाय. या खेळण्यांसाठी वापरात येणारे प्लास्टिक आणि रंग आरोग्याच्यादृष्टीने घातक तर आहेच शिवाय ‘लेझर गन’सारख्या खोट्या पिस्तुलातील ‘लेझर बीम’ डोळ्यांना घातक असल्याचं वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. लेझर गनमध्ये प्लास्टिकच्या बंदुकीवर नेम धरण्यासाठी लेझर बीम बसवलेली असते. त्यांच्याआधारे नेम धरण्यास मदत होते, पण हा बीम थेट डळ्यात गेली तर डोळ्यांना इजा होऊन अंधत्व येऊ शकतं, असं डॉक्टरांनी म्हटलंय.
परदेशांमध्ये मुलांच्या खेळण्यांबाबत कडक स्वरूपाचे कायदे आहेत. तेथील पालकही याबाबत जागरूक असल्याने मुलांना अपायकारक ठरतील, अशी खेळणी घेणं टाळलं जातं. आपल्याकडे रस्त्यावर उपलब्ध होणाऱ्या खेळण्यांबाबत कोणतेच नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे प्लॅस्टिकच्या खेळण्यांचा किंवा इतर काही टोकदार खेळण्यांपासून अपघात घडण्याचा धोका आहे. याविषयी `चाइल्ड् राइट्स कमिशन` कडेही दाद मागण्यात आली होती.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, August 10, 2013, 15:21