एलबीटीविरोधात मुंबई, कोल्हापुरातील व्यापारी आक्रमक, LBT, Bandh , LBT Tax

एलबीटीविरोधात मुंबई, कोल्हापुरातील व्यापारी आक्रमक

एलबीटीविरोधात मुंबई, कोल्हापुरातील व्यापारी आक्रमक
www.24taas.com, झी मीडिया,मुंबई

एलबीटीविरोधात मुंबईतले व्यापारी आक्रमक झालेत. आज व्यापाऱ्यांनी बंद पाळला. तर कोल्हापुरात टोलविरोधी आंदोलन पेटलयं. सोमवारी रात्री टोलनाक्यांच्या केलेल्या तोडफोडीनंतर आज कोल्हापुरात उत्स्फुर्त बंद पुकारण्यात आलाय.

एलबीटीविरोधात मुंबईतले व्यापारी आक्रमक झालेत. एलबीटीला विरोध करण्यासाठी व्यापा-यांचा आजपासून बेमुदत बंद आहे. मुंबईतील सर्व घाऊक व्यापारी आणि वाणिज्य आस्थापनांनी ही बंदची घोषणा केलीय.

किरकोळ विक्रेते ते किराणा दुकानं या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. मुंबईत 1 ऑक्टोबर 2013 पासून एलबीटी लागू होत असली तरी व्यापा-यांचा एलबीटीला विरोध आहे.

सकाळपासून कोल्हापुरातले व्यवहार ठप्प आहेत. बाजारपेठा सकाळपासून बंद आहेत. टोल विरोधी कृती समितीनं कावळानाका परिसरात चक्का जाम आंदोलन केलं. कोल्हापुरात कोणत्याही परिस्थितीत टोल सुरु होऊ देणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतलीये.

First Published: Wednesday, May 1, 2013, 20:46


comments powered by Disqus