Last Updated: Sunday, May 12, 2013, 08:56
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई एलबीटीला विरोध करत मुंबईत आंदोलन करणा-या व्यापारी संघटनात फूट पडलीय. एलबीटीच्या बंदमधून किरकोळ व्यापाऱ्यांनी माघार घेतलीय. अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतलाय.
किरकोळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी झी मीडियाशी बोलताना ही माहिती दिलीय.
एलबीटी मुंबई लागू नसतानाही आणि मुख्यमंत्र्यांनी चर्चेची तयारी दाखवली असतानाही व्यापाऱ्यांनी एलबीटीविरोधात बंद पुकारला होता. या बंदमुळं सामान्य मुंबईकरांचे हाल झाले. मात्र आता अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनातून माघार घेत असल्याची घोषणा किरकोळ व्यापारी संघटनेच्या वीरेन शहा यांनी केलीय.
तसंच या बंदमुळं मुंबईकरांचे हाल झाल्याबद्दल त्यांनी झी मीडियासोबत बोलताना मुंबईकरांची जाहिर माफी मागितलीय... दुसरीकडे नागपुरातही व्यापा-यांनी एलबीटीविरोधातलं आंदोलन मागं घेतलंय.. अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेत १६ मे पर्यंत नागपूरच्या व्यापा-यांनी आपलं आंदोलन स्थगित केलंय. त्यामुळं सामान्यांना दिलासा मिळालाय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, May 12, 2013, 08:29