Last Updated: Sunday, January 27, 2013, 16:02
www.24taas.com, मुंबईमुंबईतल्या आरे कॉलनीत बिबट्याने पुन्हा एकदा एका चिमुकल्याचा बळी घेतलाय. सौरव हा आठ वर्षांचा मुलगा घराबाहेर मित्रासोबत आला असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करत त्याला जंगलाकडे उचलून नेले.
या घटनेने स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली. जंगलात एक-दीड किलोमीटरवर गेल्यानंतर या मुलाचा मृतदेह आढळून आला.
मुंबईत गेल्या सहा महिन्यांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरु आहे.. सहा महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात 6 जणांचा बळी गेलाय...
First Published: Sunday, January 27, 2013, 16:02