Last Updated: Wednesday, November 13, 2013, 12:32
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई वरळीच्या ‘कॅम्पा कोला’च्या अनधिकृत बांधकामावर आज सकाळपासून पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात झाली. पण, मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईच्या दुसरा दिवशी सुप्रीम कोर्टानं या अनधिकृत बिल्डिंगच्या रहिवाशांना मोठा दिलासा दिलाय. सुप्रीम कोर्टानं ३१ मे पर्यंत 'कॅम्पा कोला'च्या कारवाईला स्थगिती दिलीय.
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुंबई ‘कॅम्पा कोला’च्या अनधिकृत बांधकामावर होणाऱ्या बीएमसीच्या कारवाईवर ३१ मे २०१४ पर्यंत स्थगिती दिलीय. ’३१ मे २०१४ पर्यंत मुंबई महानगरपालिकेनं कोणतीही कारवाई करू नये’ असा कोर्टाचा आदेश मुंबई महानगरपालिकेकडे कारवाई सुरू असतानाच पोहचला आणि तत्काळ मुंबई महानगरपालिकेनं कारवाई थांबविली.
कारवाईला कोर्टानं स्थगिती दिल्याची बातमी ऐकून ‘कॅम्पा कोला’ बिल्डिंगच्या रहिवाशांना मात्र मोठा दिलासा मिळाला... त्यांचे आनंदाश्रूचेही बांध फुटले. त्यानंतर रहिवाशांनी एकच जल्लोष केला.
सकाळपासूनच्या घडामोडी… > सुप्रीम कोर्टानं ३१ मे पर्यंत दिली कारवाईला स्थगिती
> अनधिकृत बिल्डिंगच्या रहिवाशांना दिलासा
> 'कॅम्पा कोला'वरच्या कारवाईला स्थगिती
> अजूनही 'कॅम्पा कोला'वरची कारवाई थांबू शकते
> आयक्तांनी मनावर घेतलं तर ते कारवाई थांबवू शकतात
> माजी मनपा आयुक्त गो रा खैरनार याचं वक्तव्य
> पोलीस आणि रहिवाशांमध्ये झटापट
> पोलिसांनी घेतला कॅम्पाकोलाचा ताबा
> पोलिसांनी घेतला कॅम्पाकोलाचा ताबा
> मनपा कर्मचाऱ्यांना रहिवाशांचा जोरदार प्रतिकार
> प्रतिकार करणाऱ्या रहिवाशांना अटक
> मार्किंग झालं... आठ घरांची वीज-पाणीही तोडलं
> मनपा कर्मचाऱ्यांनी डंपरनं बिल्डिंगचं गेट तोडलं
> मुंबई : वरळीच्या कॅम्पाकोलावर आज पुन्हा कारवाई सुरू
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, November 13, 2013, 10:58