पवारांनी लोकसभा निवडणुकीचे वाजवले बिगुल, Lok Sabha Elections ever - Sharad Pawar

पवारांनी लोकसभा निवडणुकीचे वाजवले बिगुल

पवारांनी लोकसभा निवडणुकीचे वाजवले बिगुल
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

लोकसभेत दुसऱ्या पक्षांच्या पाठिंब्यावर सरकराचं भवितव्य अवलंबून आहे. केंद्रातील सरकार कधी पडेल, याचा भरवसा नाही, असे संकेत देताना आगामी काळात निवडणुकीसाठी सज्ज राहा, असा संदेश पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील बंगल्यावर राष्ट्रवादी नेत्यांची बैठक झाली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल, खासदार डी. पी. त्रिपाठी, राज्यातले सर्व मंत्री उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार ठरविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बैठकीचे आयोजन केलं होतं. यावेळी राजकीय पक्षांना निवडणुकांसाठी नेहमीच सज्ज राहावे लागते, असे सांगून पवारांनी निवडणुकीच्या मुद्द्याला बगल दिली.

बांधकाममंत्री छगन भुजबळ, आदिवासीमंत्री बबनराव पाचपुते, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना लोकसभेची निवडणूक लढवावीच लागेल, असे शरद पवार यांनी शुक्रवारी बजावले. या वेळी परिस्थिती वेगळी असून पक्षा मोठा फटका बसू शकतो. तसेच नोव्हेंबरपर्यंत निवडणुका होतील, असा अंदाज असल्याने दुप्पट मेहनत घेऊन काम करावे लागणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

First Published: Saturday, April 27, 2013, 15:44


comments powered by Disqus