भाजप नेते मधु चव्हाणांवर बलात्काराचा गुन्हा, Madhu Chavan woman raped in Mumbai

भाजप नेते मधु चव्हाणांवर बलात्काराचा गुन्हा

भाजप नेते मधु चव्हाणांवर बलात्काराचा गुन्हा
www.24taas.com, झी मीडिया,मुंबई

भाजप मधु चव्हाण यांच्यामुळे अडचणीत आली आहे. भाजपचे नेते आणि प्रदेश प्रवक्ते मधु चव्हाण यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील काळा चौकी पोलीस ठाण्यामध्ये मधु चव्हाण यांच्यावर मंगळवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमीष दाखवून चव्हाण आपल्यावर गेल्या २० वर्षांपासून बलात्कार करत असल्याची लेखी तक्रार एका महिलेने काळा चौकी पोलीस ठाण्यात केली आहे.

या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. चव्हाण यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. या प्रकरणी आपल्याला न्यायालयात न्याय मिळेल असे म्हटले आहे. चव्हाण यांच्यावर यापूर्वीही शोषणाचे आरोप करण्यात आले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 8, 2013, 13:35


comments powered by Disqus