Last Updated: Tuesday, May 14, 2013, 15:08
www.24taas.com,झी मीडिया, मुंबई महालक्ष्मी रेसकोर्सवर बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक व्हावं, अशी खुली मागणी आता शिवसेनेनं केलीय. रेसकोर्ससारखी विशाल जागाच बाळासाहेबांच्या स्मारकासाठी योग्य असल्याचं शिवसेनेनं म्हटलयं.
खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. रेसकोर्ससारखी विशाल जागाच बाळासाहेबांच्या स्मारकासाठी योग्य असल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलंय. स्मारकाला विरोध करणारे आणि त्यावरुन वाद करणारे करंटे असल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवलीय.
मुख्यमंत्री जर स्वतःला मराठी माणसाच्या अस्मितेचे पाईक मानत असतील तर त्यांनी स्मारकाच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी.यासाठी कॅबिनेटच्या मंजुरीची गरज नाही तर थेट अध्यादेश काढा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, May 14, 2013, 14:57