मॉ़डेल मेघनाच्या फोटोंवर भाजपची तीव्र नापसंती maharashtra bjp oppose meghna patel nude photography

मॉ़डेल मेघनाच्या फोटोंवर भाजपची तीव्र नापसंती

मॉ़डेल मेघनाच्या फोटोंवर भाजपची तीव्र नापसंती

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मॉडेल मेघना पटेलने भाजप चिन्ह कमळ आणि नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून केलेल्या बोल्ड फोटोग्राफीवर महाराष्ट्र प्रदेश भाजपने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. तसेच यावर कायदेशीर आक्षेप घेता येईल का?, यावर विचार सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

नरेंद्र मोदी यांना मत द्या, असं म्हणत मेघना पटेलने फोटोशूट केलं आहे. हे फोटोशूट काल दिवसभर सोशल मी़डियावर झळकलं. मात्र मेघनाच्या या फोटोग्राफीवर नेटीझन्सने ट्वीटरवर तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली आहे.

ट्वीटरवर मेघना आणि भाजपला सल्ला देणार आणि टीका करणारे ट्वीट आल्यानंतर महाराष्ट्र भाजपने यावर आक्षेप घेणार असल्याचं म्हटलं आहे. मेघना पटेलने नरेंद्र मोदी यांच्यासाठी नको ते करण्याची गरज नसल्याचंही नेटीझन्सने म्हटलं आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, February 11, 2014, 10:27


comments powered by Disqus