Last Updated: Wednesday, August 28, 2013, 08:36
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई सध्या नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद असलेला कुख्यात गँगस्टर अबू सालेम याला लवकरच ठाण्यातील विशेष कारागृहात हलवलं जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी तळोजा कारागृहात अबू सालेमवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. अधिकाऱ्यांनी कोर्टाला यासंबंधी माहिती दिलीय.
विशेष टाडा न्यायाधीश जी. ए. सानप यांच्या न्यायालयात महाराष्ट्र कारागृह विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दाखल करण्यात आलेल्या अॅफिडेव्हिटमध्ये ही माहिती देण्यात आलीय. ‘कोणत्याही अघटीत घटनेपासून वाचण्यासाठी आणि तुरुंगाची सुरक्षाव्यवस्था कायम ठेवण्यासाठी अबू सालेम याला ठाण्याच्या कारागृहात हलवावं’ असं त्यात म्हटलं गेलंय.
सध्या तळोजा कारागृहात बंद असलेल्या सालेमवर २७ जूनला गँगस्टर देवेंद्र जगताप ऊर्फ जेडी यानं गोळ्या झाडल्या होत्या. जे. डी हा वकील शाहिद आझमी यांच्या हत्येतील आरोपी आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, August 28, 2013, 08:36