राज्य लोकसेवा आयोगाला हिंदी, उर्दू प्रिय, Maharashtra State Public Service Commission, Marathi

राज्य लोकसेवा आयोगाला हिंदी, उर्दू प्रिय

राज्य लोकसेवा आयोगाला हिंदी, उर्दू प्रिय
www.24taas.com,मुंबई

शासकीय नोकरभरती आणि राज्य लोकसेवा आयोगामार्फत होणा-या सर्व परीक्षा मराठीसोबत हिंदी आणि उर्दू भाषेतूनही घेण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवर सुरू आहेत. त्यामुळं या दोन्ही भाषा आता मराठीच्या पंक्तीत येऊन बसण्याची शक्यता आहे.

राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणा-या सर्व परीक्षा मराठी आणि इंग्रजीतून होतात. मात्र केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक आयुक्तांच्या अहवालाचा आधार घेत हिंदी आणि उर्दू भाषिकांच्या सोयीसाठी या भाषांमधून परीक्षा घेण्याची तरतूद करण्याचा विचार केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू आहे.


लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्यामुळं अल्पसंख्याकांना खूष करण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.

First Published: Wednesday, February 6, 2013, 15:21


comments powered by Disqus