हर हर महादेव, ज्योतीर्लिंगांच्या ठिकाणी रांगा, mahashivratri festival

हर हर महादेव, ज्योतीर्लिंगांच्या ठिकाणी रांगा

हर हर महादेव, ज्योतीर्लिंगांच्या ठिकाणी  रांगा
www.24taas.com,मुंबई

महाराष्ट्रातल्या घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या ज्योतीर्लिंगांच्या ठिकाणी आज पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी रांग लावलीय.

आज माघ कृष्ण चतुर्दशी अर्थात महाशिवरात्र. भगवान शंकराची आराधना करण्याचा दिवस.आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करुन घेण्यासाठी महाशिवरात्रीला अनेकजण व्रत करतात. बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी तर भक्तीचा महापूर येतो. महाराष्ट्रातल्या घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या ज्योतीर्लिंगांच्या ठिकाणी आज पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी रांग लावलीय.

हर हर महादेवच्या गजरात सर्व शिवभक्त तल्लीन झालेत. अलाहबादमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्याचाही आज शेवटचा दिवस असून त्या निमित्तानं अलाहाबादमध्येही भाविकांनी गंगास्नानासाठी मोठी गर्दी केलीय.

First Published: Sunday, March 10, 2013, 07:33


comments powered by Disqus