Last Updated: Tuesday, April 8, 2014, 13:29
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईलोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याचे मतदान दोन दिवसांवर असतानाच राज्यातील आघाडी आणि महायुती यांच्यात कडवी झुंज दिसुन येत आहे. पण झुंज कितीही कडवी असली तरी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या अंदाजानूसार फक्त दोन-चार जागांचा फरक दिसून येईल. या पेक्षा विरोधकांना अपेक्षित असा मोठा बदल घडणार नाही.
मंत्रालयात काम करणारा वर्ग हा प्रशासनाच्या नेहमीच जवळ असतो. म्हणुनच राजकारण आणि राजकीय व्यक्ती यांचे नाविण्य हे मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला जास्त नसते. हे अधिकारी आणि कर्मचारी विविधरीत्या राजकारणातील घडामोडींशी संबंध ठेऊन असतात. याच प्रकारे त्यांचे लक्ष आता लोकसभा निवडणुकीवर आहे.
यातील काही अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रस विरुद्ध महायुती अशा लढतीत काही नवीन निकालांची शक्यता कमीच आहे. देशात काँग्रेसची पिछेहाट जरी होत असली. तरी महाराष्ट्रात काँग्रेसची परिस्थिती चांगली सुधारत आहे.
अधिकाऱ्यांची चर्चा जरी अनौपचारिक असली, तरी येणाऱ्या काळात लोकसभेचा निकाल हा कोणाला धक्का देणार हे बघणं उत्सुकतेच ठरेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 8, 2014, 13:29