Last Updated: Saturday, August 18, 2012, 20:12
www.24taas.com,मुंबईमुंबईत पश्चिम रेल्वेमार्गावर रात्री रूळ ओलांडताना तिघांना आपले प्राण गमवावे लागले. शुक्रवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास माटुंगा आणि माहिम रेल्वे स्थानकादरम्यान, रेल्वे रुळ ओलांडत असताना तिघा जणांचा मृत्यू झाला. चर्चगेटहून बोरिवलीला निघालेल्या लोकलची धडक लागल्याने हा अपघात घडला.
रोहित नेवरेकर (२०), बरकत अली सय्यैद(१८) आणि अयुब शेख(३२) यांना आपला जीव गमवावा लागला आहे. रात्री उशिरा या तिघांची ओळख पटल्याचे माहिम पोलिसांनी सांगितले. हे तिघेही जण माहिम झोपडपट्टीत राहणारे आहेत. जखमी अवस्थेत नायर रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, रेल्वे रुळ ओलांडू नये यासाठी प्रवाशांसाठी वारंवार सूचना दिल्या जातात. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रेल्वे आणि पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. सूचनांचे पालन होत नसल्याने पोलिसांनी चिंता व्यक्त केली आहे.
First Published: Saturday, August 18, 2012, 20:12