डॉक्टरांसाठी खूशखबर!, Major Recruitment`s open for Doctor`s & medical staff

डॉक्टरांसाठी खूशखबर!

डॉक्टरांसाठी खूशखबर!
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. आरोग्य विभागानं राज्यात डॉक्टरांची मेगा भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांची गैरसोय दूर करण्यासाठी आरोग्य विभागानं हा निर्णय घेतल्याचं समजतंय.

शहरांमधील आणि ग्रामीण भागांमधील सरकारी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. या जागा न भरल्यानं रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. ही गैरसोयच लक्षात घेऊन आरोग्य विभाग लवकरच ‘मेगा’ भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिलीय.

यंदाच्या पावसाळी अधिवेशनात डॉक्टरांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळं रुग्णांची कशी परवड होते, याकडे आमदारांनी मंत्र्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानुसारच ही भरती केली जाणार आहे. सध्या राज्यात २१०० डॉक्टरांच्या तर नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांच्या ४६०० जागा रिक्त आहेत. त्यामुळं वरिष्ठ डॉक्टरांसह नवोदित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनाही सरकारी नोकरी मिळवण्याची संधी चालून आलीय. शिवाय डॉक्टरांसोबतच रुग्णांसाठी सुद्धा ही आनंदाची बाब आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, August 8, 2013, 14:32


comments powered by Disqus