Last Updated: Saturday, September 22, 2012, 21:39
www.24taas.com, मुंबईमुंबई पोलिसांनी लेखिका अमृता प्रीतमचा मुलगा नवराज क्वात्रा (ज्याच्यावर पोर्न चित्रपट बनविण्याचा व्यवसाय करीत असल्याचा संशय आहे) याच्या हत्येचे गूढ उकलण्यात यश मिळवल्याचा दावा केला.
पोलिसांनी याप्रकरणी चार लोकांना अटक केली आहे. यात एका युवतीचा समावेश आहे. या युवतीचे क्वात्राबरोबर शारीरिक संबंध होते. संबंधित युवती क्वात्राच्या कॅमे-यापुढे आपल्या मर्जीने अश्लिल पोज देत असे. मात्र, नंतर तिची नियत फिरली व क्वात्राची संपत्ती हडप करण्यासाठी तिने कट रचला.
याआधी बहुचर्चित लेखिका अमृता प्रीतमचा (छायाचित्रात) मुलगा व फिल्म फायन्सासर नवराज क्वात्राच्या हत्येप्रकरणी खळबळजनक पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते. मात्र चार लोकांना अटक केल्यानंतर पोलिसांनी हत्येचे कारण काही वेगळेच असल्याचे म्हटले.
First Published: Saturday, September 22, 2012, 16:57