राज ठाकरेंवर कारवाई करा- माणिकराव ठाकरे, manikrao thackeray on raj

राज ठाकरेंवर कारवाई करा- माणिकराव ठाकरे

राज ठाकरेंवर कारवाई करा- माणिकराव ठाकरे
www.24taas.com, मुंबई

`राज ठाकरे यांच्यावर प्रक्षोभक भाषणाविरोधात कारवाई करा`, अशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मागणी केली आहे. तशा संदर्भातलं पत्र माणिकरावांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पाठवलं आहे.

राज ठाकरेंची काही कृत्यं कायद्याच्या विरोधात आहेत, बंदी असूनही आझाद मैदानावरचा मोर्चा, टोलविरोधी आंदोलन आणि कलर्स चॅनेलविरोधात अचानक मागे घेतलेले आंदोलन याचा पत्रामध्ये प्रामुख्यानं उल्लेख आहे.

`राज ठाकरेंवर कारवाई करा`, अशी मागणी करीत माणिकराव ठाकरे यांनी देखील नव्या वादाला तोंड फोडलं आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे राज ठाकरेंच्या अटकेची मागणी केली आहे.`राज यांची बरीच कृत्ये कायद्याविरोधात असल्याचे माणिकराव ठाकरे यांचे म्हणणे आहे.

First Published: Friday, September 7, 2012, 18:11


comments powered by Disqus