Last Updated: Friday, August 9, 2013, 12:38
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या लोकसभा उमेदवारीची चर्चा पुन्हा सुरू झालीये. त्यांना दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल, असं आता शिवसेनेतल्या सूत्रांकडून सांगितलं जातंय.
जोशी सरांना कल्याणमधून उभं केलं जाईल, अशी चर्चा होती. मात्र दादरमध्ये मनसेचा प्रभाव बघता सरांचं नाव अधिक योग्य असल्याचं काही जणांचं मत झालंय. शिवसेना नेते मनोहर जोशींना राजकारणामुळे उमेदवारी मिळणार की नाही असं असताना दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातून पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा सुरू झालीय.
कल्याण-मतदार संघातून जोशी यांना उभं केलं जाईल, अशी शक्यता असतानाच दादर मतदार संघासाठी मनोहर जोशींचं नाव पुढे येतंय. मनसे महायुतीत येत असेल तर दक्षिण मध्य मुंबई हा कळीचा मतदारसंघ ठरु शकतो. कारण प्रतिष्ठेचा हा मतदारसंघ सोडण्यास मनसे तयार होणार नाही. याआधी दक्षिण मध्यमुंबईतून सुरेश प्रभू, संजय राऊत, सूर्यकांत महाडिक यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Friday, August 9, 2013, 12:38