सेनेचे ‘सर’ लोकसभेसाठी सज्ज, पण, Manohar joshi is ready for loksabha election, but...

सेनेचे ‘सर’ लोकसभेसाठी सज्ज, पण...

सेनेचे ‘सर’ लोकसभेसाठी सज्ज, पण...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

‘आपण लोकसभा निवडणुकीच्या रेसमध्ये आहोत’ असं शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलंय. आज मातोश्रीवर शिनसेना नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर जोशी सरांनी स्वतः ही माहिती दिली. मात्र उद्या पुन्हा बैठक होणार असून त्यानंतरच स्थिती स्पष्ट होईल, असं ते म्हणाले.

शिवसेना नेते मनोहर जोशींना अंतर्गत राजकारणामुळे उमेदवारी मिळणार की नाही? अशी चर्चा असताना दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातून पुन्हा एकदा त्यांच्या नावाची चर्चा सुरू झालीय. कल्याण-मतदार संघातून जोशी यांना उभं केलं जाईल, अशी शक्यता असतानाच दादर मतदार संघासाठी मनोहर जोशींचं नाव पुढे येतंय. मनसे महायुतीत येत असेल तर दक्षिण मध्य मुंबई हा कळीचा मतदारसंघ ठरु शकतो. कारण प्रतिष्ठेचा हा मतदारसंघ सोडण्यास मनसे तयार होणार नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मनोहर जोशी यांनीही ‘झी मीडिया’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. याचाच हा पुढचा अंक समजला जातोय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, August 9, 2013, 17:30


comments powered by Disqus