Last Updated: Sunday, November 3, 2013, 15:55
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईशिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आज ‘मातोश्री’वर गेले होते. तिथं त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दसरा मेळाव्य़ाआधी जोशी यांनी पक्षनेतृत्वावर टीका केली होती. या भेटीत कुठल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नसल्याचं जोशी सरांनी भेटीनंतर स्पष्ट केलं. मात्र, ही भेट तब्बल तासभर चालल्यानं तर्कवितर्कांना वेग आला आहे.
त्यानंतर दसरा मेळाव्यातून जोशींना अपमानित होऊन स्टेजवरून उतरावं लागलं होतं. त्याप्रकारानंतर आज मनोहर जोशी प्रथमच ‘मातोश्री’वर गेले होते. उद्धव ठाकरे यांच्याशी अनेक गोष्टींवर बोलायचं होतं मात्र भेटायला येणाऱ्या शिवसैनिकांच्या गर्दीमुळं बोलता आलं नाही, असं मनोहर जोशींनी यावेळी सांगितलं.
आठवलेंना दिवाळी गिफ्ट मिळण्याचा विश्वासमनोहर जोशींसोबतच आरपीआय नेते रामदास आठवलेही ‘मातोश्री’वर उद्धव यांच्या भेटीसाठी गेले होते. दिवाळीचं काही तरी गिफ्ट म्हणून शिवसेना-भाजपकडून रिपाइंला राज्यसभेची एक जागा मिळेल, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, November 3, 2013, 15:55