Last Updated: Thursday, November 22, 2012, 19:28
www.24taas.com, मुंबई मंत्रालयाचं रुपडं लवकरचं पालटणार आहे. मंत्रालयाचं काम पुढील आठवड्यात सुरू होणार आहे.
तब्बल १३८ कोटींचे मंत्र्यालयाच्या नुतनीकरणाचे कंत्राट ‘युनिटी कन्स्ट्रक्शन’ या कंपनीला देण्यात आलंय. हे काम आठ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. सुरूवातीला चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्याचं नुतनीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर खालच्या मजल्यावरील कार्यालये वरती हलवून दुसऱ्या टप्प्यात तळ मजल्यासह पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याचं नुतनीकरण करण्यात येणार आहे. तब्बल १२०० कामगार मंत्रालयाच्या कामासाठी राबणार आहेत.
First Published: Thursday, November 22, 2012, 19:28