२१ अधिकाऱ्यांना दणका, आधी मराठी शिका! मगच... , Marathi language : IPS officers pushed in maharashtra

२१ अधिकाऱ्यांना दणका, आधी मराठी शिका! मगच...

२१ अधिकाऱ्यांना दणका, आधी मराठी शिका! मगच...
www.24taas.com, झी मीडिया,मुंबई

महाराष्ट्रात राहणाऱ्यांना आणि काम करणाऱ्यांना मराठी येणे आवश्यक आहे, ही काही राजकीय पक्षांची मागणी योग्य आहे. हे आता अधोरेखीत झाले आहे. राज्यात प्रशासकीय काम करणाऱ्या २१ आयपीएस अधिकाऱ्यांना मराठी न आल्याने त्याचा फटका बसला आहे. आधी मराठी शिका मगच पगार, असे स्पष्ट बजावत या अधिकाऱ्यांना दणका दिलाय.

राज्यशासनामध्ये २१ आयपीएस अधिकाऱ्यांनी मराठी भाषा अवगत केलेली नसल्याचीबाब पुढे आली. राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोकरी लागल्यापासून मराठी भाषा अवगत केलेली नाही. त्यामुळे त्यांना पगारवाढ देता येणार नाही, असे गृह विभागाने स्पष्ट केलंय. त्याबाबत या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याचा आहेत गृह विभागाने काढला.

महाराष्ट्र राज्यात शासकीय सेवेत असूनही मराठी भाषेचे किमान ज्ञान ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी अवगत केलेले नाही. मराठी द्वेष्ट असणाऱ्या या अधिकाऱ्यांना जोरदार धक्का देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये काही मराठी अधिकारी असल्याचे वास्तवही पुढे आलेय.

ज्या राज्यात सनदी अधिकारी म्हणून काम करताना त्या राज्याची भाषा येणे आवश्यक आहे. मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. या भाषेची गळचेपी काही अधिकारी करीत आहेत, असा आरोप वेळोवेळी केला जात होता. तो आता आरोप यामुळे खरा असल्याचे या २१ आयपीएस अधिकाऱ्यामुळे स्पष्ट झालाय. राज्यभाषेचे प्राथमिक ज्ञानही या अधिकाऱ्यांना नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ते येथील प्रश्न कसे समजून घेणार, असा प्रश्न उपस्थित होत होता.

मराठी भाषेकडे काणाडोळा करणाऱ्या या अधिकाऱ्यांना चाप बसला आहे. यापुढे मराठी न येणाऱ्या अधिकाऱ्यांना यामुळे चांगलाच धडा मिळणार आहे. गृहखात्याने आयपीएस कक्षाचे सहायक संचालक शार्दूल पाटील यांच्या सहीने २१ अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश एका परिपत्रकानुसार काढले. यात भारतीय पोलीस सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. तसेच मराठी निम्नस्तर भाषा परीक्षा उत्तीर्ण न झाल्याने या सर्व आयपीएस अधिकाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ रोखण्यात आली आहे.

कोण आहे ते अधिकारी

मुंबईतील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) निकेत कौशिक, बृहन्मुंबई मुख्यालयातील पोलीस उपायुक्त शारदा राऊत, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे दक्षता व सुरक्षा संचालक जगन्नाथ, जळगावचे पोलीस अधीक्षक एस. जयकुमार, औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस अधीक्षक ईशू सिंधू हे वरिष्ठ अधिकारी तर ८ उपविभागीय पोलीस अधिकारी किंवा सहायक पोलीस आयुक्तपदावर सेवारत असलेले आणि ९ प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी.

डॉ. सौरभ त्रिपाठी (अमरावती ग्रामीण), नियती ठक्कर (औसा, जि. लातूर), अंकित गोयल (चांदूर, अमरावती ग्रामीण), शैलेश बलकवडे (कन्नड, औरंगाबाद ग्रामीण), एम. राज कुमार (उमरगा, उस्मानाबाद), दीपक आत्माराम साळुंखे (रामटेक, नागपूर ग्रामीण), बसवराज तेली (पाचोरा, जळगाव) हे आयपीएस अधिकारी समाविष्ट आहेत, तर प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये अक्कनौरू प्रसाद प्रल्हाद (सांगली), अमोघ जीवन गांवकर (सोलापूर ग्रामीण), पंकज अशोकराव देशमुख (अमरावती ग्रामीण) आणि मंजुनाथ सिंगे (अलोका) यांचा समावेश आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 31, 2013, 10:43


comments powered by Disqus