झोपडपट्टीवासीयांसाठी मेधा पाटकरांचा मोर्चा Medha Patkar`s rally for jhuggi people

झोपडपट्टीवासीयांसाठी मेधा पाटकरांचा मोर्चा

झोपडपट्टीवासीयांसाठी मेधा पाटकरांचा मोर्चा
www.24taas.com, मुंबई

मुंबईत झोपड्यांमध्ये राहणा-या नागरिकांना कायमस्वरुपी घरं मिळावीत यासाठी राजीव आवास योजनेची अंमलबजावणी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली आहे.

यासाठी मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर ते मंज्ञालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे ज्याला शिवाजीनगर पासून सुरूवात झाली. या मोर्च्यात ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर सभागी झाले होते. गरीबांच्या समस्येकडे दुर्लक्ष करणा-या सरकारची संवेदनशीलता हरवली आहे अशी टीका त्यांनी केली.

तसंच मुंबईमध्ये बिल्डरांची सुरू असलेली दांडगाई थांबवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचं मोधा पाटकर म्हणाल्या.

First Published: Tuesday, January 1, 2013, 23:14


comments powered by Disqus