पोलिसांचे मनोधैर्य वाढवा – राज ठाकरे, Meet Raj Thackeray to Mumbai commissioner

पोलिसांचे मनोधैर्य वाढवाः राज ठाकरे

पोलिसांचे मनोधैर्य वाढवाः राज ठाकरे
www.24taas.com,मुंबई

पोलिसांचे मनोधैर्य वाढवा, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांना दिला. मुंबईतील हिंसाचारानंतर पोलिसांना मार खावा लागला होता. तर महिला पोलिसांची छेड काढली गेली होती. याविऱोधात मनसे रस्त्यावर उतरत राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता.

सीएसटी हिंसाचारानंतर अरुप पटनायक यांच्या जागी नियुक्ती झालेल्या सत्यपाल सिंह यांची राज यांनी भेट घेतली. सीएसटी हिंसाचाराचा तपास एसआयटी योग्य प्रकारे करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. हिंसाचारानंतर पोलिसांना मार खावा लागला होता. तर महिला पोलिसांची छेड काढली गेली होती. त्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खचले आहे. नेहमी शासनाच्या आदेशाची वाट पाहावी लागते. पोलिसांनी हिंसाचाराच्यावेळी योग्य निर्णय घेता आला नाही. त्यामुळे हिंसाचार करणाऱ्या लोकांचे आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी पोलिसांना टार्गेट केले, असे राज ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले होते.

पोलीस आयुक्तांशी सकारात्मक चर्चा झाल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितले. गृहमंत्री आर आर पाटील यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा रजा यांनी यावेळी पुनरुच्चार केला.

First Published: Monday, August 27, 2012, 19:27


comments powered by Disqus