Last Updated: Thursday, January 10, 2013, 12:48
www.24taas.com, मुंबईहर्षवर्धन जाधव यांनी मनसेला रामराम केल्यानंतर राज ठाकरेंवर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक बोलावण्यात आली आहे.
राज ठाकरेंचे निवासस्थान कृष्णकुंजवर ही बैठक होते आहे. दुपारी १ वाजता ही बैठक होणार असून त्यानंतर हर्षवर्धन जाधवांच्या आरोपांवर मनसे अधिकृत उत्तर देण्याची शक्यता आहे.
मनसेवर आर्थिक देवाण-घेवाण करण्याचे आरोप झाल्यानंतर काल मनसे नेते बाळा नांदगावकर आणि राज ठाकरेंची बैठक झाली होती. त्यानंतर आजही दुपारी औरंगाबादच्या नेत्यांची बैठक होते आहे. त्यापूर्वी मनसेच्या जिल्हा संपर्क अध्यक्षांची बैठकही होणार आहे.
First Published: Thursday, January 10, 2013, 12:33