हार्बरवर मेगाब्लॉक! नो टेन्शन, रेल्वे सुरूच, Megablok, no tension : Starting in Harbour Railway

हार्बरवर मेगाब्लॉक! नो टेन्शन, रेल्वे सुरूच

हार्बरवर मेगाब्लॉक! नो टेन्शन, रेल्वे सुरूच
www.24taas.com,झी मीडिया, मुंबई

हार्बरवासीयांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने खूशखबर दिलेय. मेगाब्लॉक जरी हार्बर रेल्वेवर असला तरी पनवेल-सीएसटी आणि सीएसटी-पनवेल सेवा सुरूच ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे हार्बरवरील प्रवाशांचे मेगाहाल थांबणार आहेत.

येत्या रविवार ५ मे२००१३पासून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. काही महिन्यांपूर्वीच ठाणे यार्डाचे नुतनीकरणाचे काम करण्यात आलेय. हे काम करतानाच नवीन सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली, तर काही ठिकाणी विद्युत यंत्रणाही नव्याने लावण्यात आलेय. यामुळे ३४ नवीन क्रॉसिंगही झाले असून, यातील ६ क्रॉसिंगचा फायदा हा हार्बरवासीयांना मिळणार आहे.

मेगाब्लॉक काळात सीएसटी ते पनवेल-वाशी अशी वाहतूक सुरूच ठेवण्यात येणार आहे. यासाठी सहा क्रॉसिंगचा वापर हार्बरच्या ट्रेनसाठी केला जाणार आहे. हार्बरवरील ट्रेन सीएसटी ते मुलुंड अशी धावल्यानंतर ती मुलुंड स्थानकापासून ३ नंबर स्थानकावरून पाच नंबर स्थानकावर वळवण्यात येईल त्यानंतर हार्बरच्या दिशेने मार्गस्थ होईल.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही सेवा सुरू करण्यास अडचणी येत होत्या. आता या अडचणी दूर करून येत्या रविवारी असणाऱ्या मेगाब्लॉक दरम्यान हार्बर सेवा सुरूच ठेवली आहे. मेगाब्लॉक काळात हार्बर मार्गावरून विशेष लोकल सोडण्यात येतात. तसे न करता आता सरसकट लोकल सेवा देण्यात येणार असल्याचेही निगम यांनी स्पष्ट केले.

First Published: Tuesday, April 30, 2013, 16:16


comments powered by Disqus