मुंबईला स्वाईन फ्लूनंतर MERSचा धोका, MERS in Mumbai

मुंबईला स्वाईन फ्लूनंतर MERSचा धोका

मुंबईला स्वाईन फ्लूनंतर MERSचा धोका
www.24taas.com,झी मीडिया, मुंबई

पाच वर्षापूर्वी मुंबई-पुण्यात थैमान घालणा-या स्वाईन फ्लूची अनेकांनी धास्ती घेतली होती. स्वाईन फ्लू नंतर आता MERS या नव्या विषाणूचा मुंबईला सर्वाधिक धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

या नव्या विषाणूजन्य आजाराची साथ सध्या दक्षिण आशियात पसरलीय. स्वाईन फ्लूची दहशत अनुभवलेल्या मुंबई महापालिकेनं या संभाव्य संकटाशी दोन हात करण्याची तयारी सुरु केलीय.विशेष म्हणजे या आजारावर अजुनही कोणतीही लस उपलब्ध नाही.


आत्तापर्यंत या आजाराचेजगभरात ८५ रुग्ण आढळले असून त्यातल्या ४५रुग्णांचा मृत्यू झालाय. पाच वर्षांपूर्वी आलेल्या स्वाईन फ्लूच्या विषाणूप्रमाणंच एमईआरएस हा विषाणू संसर्गजन्य आहे. सध्या सुरू असलेल्या रमजान या पवित्र महिन्यासाठी तसंच ऑक्टोबरमध्ये होणा-या हज यात्रेसाठी भारतातून लाखो भाविक हजला त्याठिकाणी जात असल्यानं त्यांच्यामार्फत हा विषाणू देशात येण्याची शक्यता आहे.

हज यात्रा याठिकाणी नोकरीला असलेल्या नागरिकांमार्फत हा विषाणू पसरू शकतो. मात्र, विमानतळावर उतरणा-या प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना अजूनही राज्य सरकारनं दिलेल्या नाहीत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, July 23, 2013, 09:24


comments powered by Disqus