Last Updated: Friday, November 22, 2013, 21:24
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबईतील एमईटीच्या गैरव्यवहार प्रकरणात छगन भुजबळ अडचणीत येण्याची शक्यता आहे. एमईटीचे माजी विश्वस्त सुनील कर्वे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे.
एज्युकेशन ट्रस्ट अर्थात एमईटीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप सुनील कर्वे यांनी केलाय. याबाबत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात तक्रार केली. याची दखल घेत मुंबई पोलिसांकडे कारवाई बाबत माहिती न्यायालयाने मागितली आहे. तक्रार अर्जावर काय कारवाई करणार, हे आठ आठवड्यांच्या आत कळवा असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना दिला आहे.
एमईटीच्या मालमत्तेचा वापर भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलाय. निधीदेखील स्वत:साठी वापरला, त्यामुळे एमईटीचे नुकसान झालं आहे. एमईटीच्या इमारतीचा काही भाग भुजबळांच्या खासगी कामासाठी वापरला जात असल्याचा आरोप सुनील कर्वे यांनी केला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता मुंबई पोलीस काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, November 22, 2013, 21:24