Last Updated: Friday, April 26, 2013, 15:28
www.24taas.com, मुंबईम्हाडाच्या घरांची जाहिरातीची प्रतीक्षा आणखीन लांबलीये. म्हाडाच्या जाहीरातीचा मुहूर्त लांबणीवर पडलाय. या घरांसाठी 25 एप्रिलचा दिवस निश्चित करण्यात आला होता. मात्र गुरुवारीही मुंबईकरांची निराशा झाली. त्यानंतर आज जाहिरात प्रसिद्ध होईल असं म्हाडाच्या सूत्रांनी सांगितलं होतं.
आजही जाहिरात प्रसिद्ध न झाल्यानं सर्वसामान्य मुंबईकरांची निराशा झालीये. जाहिरात प्रसिद्ध न होण्यामागं अनेक कारणं सांगितली जात असली तरी निश्चित कारण अजूनही अधिकृतरित्या सांगण्यात आलेलं नाही. जाहिरातीस आणखी उशीर झाल्यास त्याचा ऑनलाईन प्रक्रियेवर परिणाम होण्य़ाची शक्यता आहे. 1 मेपासून या घरांसाठीची ऑनलाईन प्रक्रिया सुरु होणार आहे. तर सहा मेपासून अनामत रक्कम भरण्यासाठी नेट बँकिंग सुविधा असणार आहे. 21 मे ही अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे.
31 मे रोजी लॉटरी काढण्यात येणार आहे. यात पवई, तुंगा व्हिलेज, मागाठणे, चारकोपमध्ये ही घरे असणार आहेत. सर्व उत्पन्न गटांसाठी ही लॉटरी असून, ही सर्व प्रक्रिया ऑनलान होणार आहे.
First Published: Friday, April 26, 2013, 15:28