Last Updated: Wednesday, April 24, 2013, 23:26
www.24taas.com, मुंबई मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. म्हाडाच्या १२६०हून अधिक घरांसाठी उद्या जाहिरात निघणार आहे. १ मेपासून या घरांसाठीची ऑनलाईन प्रक्रिया सुरु होणार आहे. तर सहा मेपासून अनामत रक्कम भरण्यासाठी नेट बँकिंग सुविधा असणार आहे. २१ मे ही अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. ३१ मे रोजी लॉटरी काढण्यात येणार आहे.
म्हाडाची पवई, तुंगा व्हिलेज, मागाठणे, चारकोपमध्ये ही घरे असणार आहेत. सर्व उत्पन्न गटांसाठी ही लॉटरी असून, ही सर्व प्रक्रिया ऑनलान होणार आहे. घरे ताब्यात घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक असणार आहे. कोकण मंडळाच्या घरांची यावर्षी लॉटरी निघणार नाही.
सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या म्हाडाच्या घरांच्या सोडतीच्या किंमती अखेर ठरल्यायत. यावेळी म्हाडानं घरांच्या किमतीचे सगळे रेकॉर्डस मोडलेत. या घरांच्य किमतीनं सर्वसामान्यांचे डोळे नक्कीच पांढरे होणार आहेत. मालवणी इथल्या अत्यल्प गटासाठी फक्त १८० चौरस फुटांच्या घराची किंमत ७ लाख ८ हजार आहे. तर पवईजळच्या तुंगा इथल्या उच्च उत्पन्न गटाच्या ४७६ चौरस फुटाच्या घराची किंमत ही सगळ्यात जास्त आहे.
तब्बल ७६ लाख ६० हजार इतकी पवईतल्या घरांची किंमत आहे. तर सगळ्यात मोठं घर गोराई रोडमध्ये उच्च उत्पन्न गटासाठींचं आहे. ७४० चौरस फुटांचं हे घर आहे. या घराची किंमत ६६ लाख रुपयांच्या घरात आहे. तर मध्यम उत्पन्न गटातील घरांच्या किमतीही या ४३ ते ५२लाख रुपयांच्या घरांत आहे.
First Published: Wednesday, April 24, 2013, 16:34